डॉ. अवनी राजाध्यक्ष यांच्या ‘होलिस्टिक हीलिंग’


 ला आंतरराष्ट्रीय मागणी ! 


हल्ली बऱ्याच कलाकारांमध्ये एकापेक्षा जास्त कला असल्याचं दिसून येतं. अभिनयाबरोबरच बरेच कलाकार नृत्य, गायन, चित्रकला अशा कला तसेच पोहणं, धावणं, योग ई. मध्ये पारंगत असल्याचे दिसून येते. कलाक्षेत्रात असल्यामुळे अनेक कलाकार आरोग्याविषयी बरेच जागरूक असल्याचे आढळून येते. शारीरिक व मानसिक संतुलन याबद्दल जागरूकता ठेवणाऱ्या एका अभिनेत्रीने ‘होलिस्टिक हीलिंग’ साठी alternative medicines मध्ये चक्क डॉक्टरेट मिळविली व आता आपला वेळ इतरांच्या समस्या सोडविण्यात व्यतीत करीत आहे. पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री विनीता घोसाळकर व आताच्या डॉ.अवनी राजाध्यक्ष या सध्या प्रथितयश ‘इन्फायनाईट हीलिंग सेंटर’ चालवितात ज्याद्वारे त्यांनी अनेकांना आपल्या आंतरिक समस्यांपासून रोगमुक्त केले आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये रेकी, टॅरो कार्ड रिडींग, ऑरा क्लिंझिंग, क्रिस्टल बॉल गेझिंग, चक्र बॅलन्सिंग अशा वीसेक प्रकारांनी ‘हीलिंग’ केले जाते व शिकविलेही जाते. तर अशा ह्या फॉरेन्सिक ग्राफॉलॉजिस्ट म्हणूनही काम केलेल्या ख्यातनाम ‘होलिस्टिक हीलिंग डॉक्टर’ डॉ.अवनी राजाध्यक्ष यांना आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळत आहे. 
अवनी राजाध्यक्ष म्हणजेच पूर्वाश्रमीच्या विनीता घोसाळकर यांनी कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने नाव कमविले. नाटक मालिकांमधून कामे करीत त्यांनी मनोरंजन विश्वात आपले स्वतःचे असे स्थान मिळविले होते. ‘टेक ईट ईझी’, ‘बुवा तेथे बायका’ सारखी मराठी नाटकं, ‘तीन तेरा पिंपळझाड’, ‘बा बहू और बेबी’ सारख्या अनेक मराठी व हिंदी मालिकांमधून त्यांनी अभिनय करत प्रेक्षकांचे प्रेम मिळविले आहे. तसेच त्या उत्तम ‘व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट’ आहेत व त्यांच्या आवाजातील ‘रेकॉर्डेड मेसेजेस’ अनेक कंपन्यांच्या दूरध्वनींच्या ‘आयव्हीआरएस’ चा भाग आहे. कलाक्षेत्राची चमक धमक बाजूला सारत या हरहुन्नरी कलाकार डॉ अवनी राजाध्यक्ष यांनी  ‘इन्फायनाईट हीलिंग सेंटर’ सुरु केले. या सेंटरची ख्याती ‘यूरोप’मध्येसुद्धा पोहोचली असून यावर्षी २५ व २६ मे रोजी डॉ. राजाध्यक्षांचे नेदरलँडमध्ये वर्कशॉप्स आयोजित करण्यात आले होते व त्यांनी तिथल्या उपस्थितांना आपल्या ‘होलिस्टिक हीलिंग’ बद्दल अवगत केले. 
एका अभिनेत्रीचा असा अभिनव व नेत्रदीपक प्रवास क्वचितच पाहायला मिळतो त्यामुळे डॉ. अवनी राजाध्यक्ष यांनी ‘होलिस्टिक हीलिंग’ मध्ये मिळविलेले यश अजूनही देदिप्यमान ठरते.


Comments